Home क्राईम खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

0
26

 भुसावळ प्रतिनिधी । खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्‍या आरोपीला शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहर पोलीस स्थानकामध्ये विनोद लक्ष्मण चावरिया (वय ३५, रा. कवाडे नगर भुसावळ) याच्या विरूध्द गु.र.क्र. ८७/२०१९, भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तो फरार झालेला आहेे. दरम्यान, दोन दिवसांआधी तो शहरात चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिसांना मिळाले होती. मात्र तेव्हा तो पलायन करण्यात यशस्वी झाला होता. तथापि, यानंतर शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सैयद वली व संजय पाटील यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound