भुसावळ प्रतिनिधी । पिस्तुलचा धाक दाखवून लूट करणार्या आरोपीला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात २२/५/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी नामे राजेश रमाशंकर दुबे रा.शनिमंदिर वॉर्ड भुसावळ हे दिनांक २१.०६.२०२० रोजी रात्री ०९.०० ते १०.०० वाजेच्या सुमारास त्याचे भाऊ संतोष दुबे व राहुल चौधरी सोबत भुसावळ शहरात आठवडे बाजारात मध्ये ओट्यावर बसले होते.
यावेळी आरोपी बाबा काल्या व रईस याच्या सोबत दोन इसम यांनी फिर्यादिस सिगारेट मागण्याच्या कारणावरून बाबा काल्या याने त्याच्या कमरेतून पिस्तुल काढून धमकावले. त्यांनी फिर्यादीचा १५००० रु मूल्य असणारा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन शिवीगाळ व धमकी दिली होती. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरनं ०६६७/२०२० भा द वि कलम-३९४,३२३, ५०४,५०६,३४ आर्म ऍक्ट कलम-३/२५ प्रमाणे दिनांक २२.०५.२०२० रोजी ०२.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा घडल्या पासून तीन महिने फरार असलेला आरोपीशेख रईस शेख रशीद (वय-२२ रा.जाम मोहल्ला भुसावळ) याला शहरातून रेल्वे स्टेशन भागातून रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलीस कर्मचारीच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच पोलीस निरीक्षक दिनकर डबाळे लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो स्टे चे सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी,पो.कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,श्रीकृष्ण देखमुख, दिनेश कापडणे तसेच रेल्वे सुरक्षा बल चे आर पी एफ नरेंद्र कुसवा,आर. के. यादव व भुसावळ लोहमार्ग पोलीस चे पोहेका अजित तडवी,जगदीश ठाकूर यांच्या पथकाने केली. गुन्हाचा तपास सहा पोलीस निरीक्षक श्री अनिल मोरे करीत आहे.