भुसावळ, प्रतिनिधी | चाकूचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस आज (दि.६) येथील बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात बस स्थानक परीसरात आज तो संशयास्पदरित्या फिरत असताना आढळून आला होता.
बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली असता त्याने तो पहूर रहिवाशी असून त्याचे नाव गौरव राजु कुमावत (वय २६) असे सांगितले. त्याप्रमाणे पहूर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी हा इसम पहुर पो.स्टे. ला दाखल असलेल्या गुरनं २३०/२०१९ भादवि कलम- ३६५, ३७६, (२) (ड), ५०६, ३४, सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम-३(१)(डब्लू)(ii)गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे सांगितल्याने तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पो.हे.कॉ. सुनिल जोशी, शंकर पाटील, संजय भदाने, पो.ना.रविंद्र बिह्राडे, रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी केली.