एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती पुन्हा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभा जागांसाठी आज पार निवडणूक पार पडली आहे. निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. आज मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहे. ७ एजन्सीच्या सर्व्हेपैकी ५ एजन्सीच्या सर्व्हेच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

न्युज १८-मैट्रिजच्या एक्झिट पोल महायुतीला १५०-१७० तर महाविकास आघाडीला ११०-१३० जागा मिळू शकतात. पी-मार्कच्या एक्झिट पोल महायुतीला १३७-१५७ तर महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळू शकतात. न्युज-२३ चाणक्यच्या एक्झिट पोल महायुतीला १५२-१६० तर महाविकास आघाडीला १३०-१३८ जागा मिळू शकतात. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल महायुतीला १८२ तर महाविकास आघाडीला ९७ जागा मिळू शकतात. इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोल महायुतीला ११८ तर महाविकास आघाडीला १५० जागा मिळू शकतात. पोल डायरीच्या एक्झिट पोल महायुतीला १२२-१८६ तर महाविकास आघाडीला ६९-१२१ जागा मिळू शकतात.

Protected Content