दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान-निकोबारमध्ये पोहोचला आहे. 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. गेल्या वर्षीही अंदमान निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता, मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता. यंदा मान्सून सामान्य तारखेपूर्वीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे. जाहीर केलेल्या तारखेत ४ दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो.आयएमडीनुसार, मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये 25 जून ते 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. तर यूपीमध्ये 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत पोहोचेल.