अज्ञात डंपरने कारला धडक दिल्याने भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू

भोपाल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्हयाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मध्य प्रदशे राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. जयप्रकश किरार यांचे अपघाती निधन झाले. ११ मे रोजी शनिवारी रात्री उशिरा जयप्रकाश उज्जैनवरून परत येत होते. दरम्याने खानपुरा गावाजवळ त्यांच्या कारला अज्ञात डंपरने धडक दिल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. त्यामुळे त्यांचा जागीच अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर रायसेन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे देण्यात आले. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, या दुर्घटनेत जयप्रकाश यांच्या कारला धडक देऊन डंपरचालक फरार झाला आहे. डंपरसह चालक फरार असून पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असून कसून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

Protected Content