Home क्राईम पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; ९ विद्यार्थी ठार

पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; ९ विद्यार्थी ठार

0
54
accident on pune solapur road

accident on pune solapur road

पुणे प्रतिनिधी । पुणे ते सोलापूरच्या दरम्यान ट्रक व कारच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. या भीषण अपघातामध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज हे नऊ महाविद्यालयीय विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. सर्व मयत यवत येथील रहिवासी असून ते रायगडावरून फिरून आल्यानंतर हा अपघात घडला.


Protected Content

Play sound