Home क्राईम गिरणा पुलावर दोन ट्रक धडकल्या

गिरणा पुलावर दोन ट्रक धडकल्या

0
69

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील गिरणा पुलावर मध्यरात्रीनंतर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, डब्ल्यू बी २३-१८६४ तसेच एमएच १५- ईजी ५२५६ या क्रमांकाच्या दोन ट्रकची गिरणा पुलावर समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री एक वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, पुलावर अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मात्र एकच मार्ग सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही अतिशय संथ गतीने सुरू आहे. शहराकडून शिव कॉलनीपर्यंत तर दुसर्‍या बाजूने विद्यापीठापर्यंत वाहनांची रांग लागल्याचे वृत्त आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound