Home Cities एरंडोल वराडजवळ अपघात ; दोन जागीच ठार

वराडजवळ अपघात ; दोन जागीच ठार


accident 1
 

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील वराड गावाजवळ आज सकाळी कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.

 

 

या संदर्भात अधिक असे की, पिंपळकोठा येथील रहिवाशी दाऊद शेख राजुद्दिन शेख (वय २१) व शोएब अली हरून अली (वय २१) हे दोघं जण आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जळगावला कामासाठी आपल्या दुचाकीवर निघाले होते. दाऊद हा पाण्याच्या मशीनच मॅकेनिक होता. तर शोएब हा एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. वराड जिनिग जवळ अचानक समोरून येणाऱ्या अल्टो कारने दोघांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दाऊद आणि शोएब या दोघांच्या डोक्याला जबर फटका बसल्याने दोघं जण जागीच ठार झाले. दरम्यान, या अपघातामुळे काहीवेळ दुतर्फा वाहतूक रखडली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound