Home क्राईम हरताळा फाट्यावरील अपघातात दोन ठार

हरताळा फाट्यावरील अपघातात दोन ठार

0
42


मुक्ताईनगर प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर हरताळा फाट्याजवळ डंपरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली.

हिंगणे (ता.बोदवड) येथील प्रवीण उर्फ अमोल अशोक पाटील (वय २३) आणि अमोल आनंदा पाटील (वय २३) हे दोघे काहूरखेडा (ता. भुसावळ) येथून मुक्ताईनगरकडे परत येताना हरताळा फाटा परिसरात एमएच.१९-सीवाय.३२४६ या क्रमांकाच्या वाळू डंपरने दोघांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातामध्ये प्रवीण आणि अमोल पाटील हे दोघे जागीच ठार झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound