भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील फेकरी येथील रेल्वेच्या उड्डाण पुलावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कोसळल्याची घटना आज सायंकाळी घडली.
छत्तीसगडमधील रायपुरकडे जाणारा ट्रक क्र. सीजी ०४ एच.पी.९४०१ हा फेकरी उड्डाण पुलावरुन जात असतांना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात गाडीचा क्लिनर जखमी झाला आहे. तथापि, यात सुदैवाने प्राणहानी घडली नाही. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.