जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील आहुजा नगरजवळ टँकरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आहुजानगरजवळ एचएम०३ सीपी ७४५६ हा टँकर मुंबईकडे जात असतांना एमएच१९ एआर ७०८८ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वार पंकज पांडुरंग महाजन (वय २६, रा. किनगाव, ता. यावल) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पाळधीच्या महामार्ग पोलीस मदत केंद्रावरील एएसआय जाधव यांच्यासह सोपान पाटील, भागवत धांडे, गजानन पाटील, कपिल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.