जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून जवळ असलेल्या कुसुंबा येथील विमानतळ परिसरात एस्कॉर्ट मधील पोलीसांच्या चार वाहने एकमेकांवर आदळली असून वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची घटना मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.
जळगाव येथील सागर पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुसुंबा येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर पोलीसांच्या वाहनांचा ताफा जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाला. त्यावेळी विमानतळ परिसरातच ताफ्यातील एस्कॉर्ट मधील पोलीसांच्या चार वाहने एकमेकांर आदळली. या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी किंवा गंभीर जखमी नसून पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा वाहनाचा ताफा लागलीच सभे ठिकाणी रवाना झाला होता.