हायवेने पुन्हा घेतला बळी : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन महिलांच्या अपघाती मृत्यूमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज पुन्हा हायवेवर एकाचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आहुजानगर जवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे.

जळगाव शहरात्ूान जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सध्या भयंकर दुर्दशा झाली असून काही दिवसांपूर्वीच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन महिलांना प्राण गमवावे लागले होत्ो. यामुळे कालच शहरात्ूान माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेत्ृात्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात दोन दिवसांमध्ये हायवेची दुरूस्ती न केल्यास जनता जेसीबीने हायवे खोदून काढणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र याला 24 तास उलटत नाही तोच पुन्हा मोठा अपघात झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या द्वारकानगरातील रहिवासी अजबसिंग नारायण पाटील ( वय 78) हे महामार्ग ओलांडत असतांना जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

अपघातात अजबसिंग पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन रास्तो रोको आंदोलन केले. आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यामुळे दोन तास वाहनांची कोंडी झाली. तर ठेकेदारावर कार्यवाहीसह महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Protected Content