जळगाव प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकात एसटी बसने एका विद्यार्थीनीला उडविल्यामुळे ती जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाशवाणी चौकात अतिशय भरधाव वेगाने वळण घेणार्या जळगावहून शेगावकडे जाणार्या एसटी बसने पूजा युवराज चौधरी या विद्यार्थीनीला उडविले असून यात ती जखमी झाली आहे. जखमी तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एसटी बसला जिल्हापेठ पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. संबंधीत तरूणी ही सायकल चालवत असून ती बसच्या पुढील चाकात आल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये तरूणी बचावली असून तिच्या सायकलचा मात्र चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.