ठाणगाव-पाटोदा रस्त्यावरील अपघातात बीएसएफ जवानाचा मृत्यू

320 214 2920065 thumbnail 3x2 nashik

नाशिक (वृत्तसेवा) येवला तालुक्यात ठाणगाव-पाटोदा रस्त्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.  सागर रानोबा खुरसने असे मृत जवानाचे नाव आहे.

 

सागर सोबत असलेला मुलगा व भाऊ यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना येवलाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर रानोबा खुरसने हे गुढीपाडव्याच्या निमित्त ठाणगाव या आपल्या गावी आले होते. ते ठाणगाव येथून दुचाकीवर मुलगा व भावासोबत मनमाडकडे येत असताना हा अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत येवला तालुका पोलिसांना माहिती देऊनही पोलीस सुमारे दोन तासानंतर घटनास्थळी आले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर सैन्यात असलेल्या जवानांच्या बाबतीत पोलीस इतके बेफिकीरपणे वागत असतील तर सामान्यांचे काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे

Add Comment

Protected Content