जळगाव आरटीओ कार्यालयात एसीबीचा सापळा; अधिकाऱ्यासह पंटरला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जागी दीपक पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याला नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, संबंधीत अधिकाऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत खात्याच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील कार्यालयात तक्रार केली. या प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक पथक तयार केले. या पथकाने आज दुपारी दीपक पाटील यांना भीकन भावे या पंटरच्या माध्यमातून तीन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली.

या कारवाईत आरटीओच्या मुख्य अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात अटकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आरटीओ कार्यालयातील लाचखोरीचे मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी दीपक अण्णा पाटील ( वय 56 वर्ष, व्यवसाय-नोकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता. जि. जळगाव ) आणि
भिकन मुकुंद भावे (वय, 52 वर्ष, खाजगी इसम, रा. आदर्श नगर प्लॉट नं. 98 ,जळगाव ) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content