जळगाव प्रतिनिधी । गाईच्या चाऱ्याच्या गोडावुन वरून गेलेल्या विद्युत तारा चाऱ्याच्या गोडावुनच्या बाजुने करून दिल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून विद्यूत सहाय्यकाने दहा हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीने रंगेहात पकडले आहे. राहुल संतोष बेंडाळे असे लाच स्विकारणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील शेतकरी असून त्यांच्या शेतात असलेल्या गाईच्या चाऱ्याच्या गोडावुन वरून गेलेल्या विद्युत तारा चाऱ्याच्या गोडावुनच्या बाजुने करून दिल्याच्या मोबादल्यात तक्रारदार यांचेकडे 10 हजार रूपयांची लाचेची मागणी विद्यूत सहाय्यक राहुल संतोष बेंडाळे वय 24, रा. शिंदाड, ता.पाचोरा, रा-त्र्यंबक नगर, पाचोरा यानी केली. गुरूवारी दुपारी लाच लुचपत विभागाने सापळा रचून आरोपी राहूल बेंडाळे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
जी.एम.ठाकुर,पोलीस उपअधीक्षक,निलेश लोधी,पोलीस निरीक्षक,गणेश कदम, पोलीस निरीक्षक, पो.ना.मनोज जोशी, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.