जळगाव प्रतिनिधी । विद्यूत मिटर जळाल्याने नवीन मीटर बसविण्यासाठी दोन हजार रूपयाची लाच स्विकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे घरगुती विद्युत मिटर जळाल्याने त्यांना रिप्लेसमेंट म्हणुन नविन विद्युत मिटर देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिपक केशव पाटील, वय-32 रा. खेडी ता.जि.जळगाव यांनी पंटर निलेश दामू जाधव (वय-25) रारा.अयोध्या नगर, जळगाव, आणि नितीन गोविंदा परदेशी, वय-29, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंटचे बाजूला, प्लॉट नं. 4 प्रभात चौक यांच्या माध्यमातून दोन हजार रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर खात्री करण्यासाठी सापळा रचत आरोपी पंटर निलेश जाधव आणि नितीन परदेशी यांच्याकडून दोन हजार रूपये रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोनि निलेश लोधी, पोना.मनोज जोशी,जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.