Home Cities जामनेर जामनेरात अभाविपचे विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र

जामनेरात अभाविपचे विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र

0
25
jamner abvp

jamner abvp

जामनेर प्रतिनिधी । नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या मदत केंद्राचे उदघाटन उपप्राचार्य डॉ शिरीष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविन्यासाठी व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केले जाईल. या केंद्रामुळे विद्यार्थ्याना प्रवेश प्रक्रिया अडचणी सोडविण्यात येणार आहेत. याप्रसंगी डॉ विजेंद्र पाटील, प्रा.खंडायते अभाविपचे जळगाव जिल्हा संयोजक प्रमोद सोनवणे, मनोज जंजाळ ,अक्षय जाधव , शुभम मोरे ,चेतन नेमाडे ,अमोल माळी, विशाल राजपुत, पुजा पवार आदींसह अभाविपचे सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound