पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्हयातील राजगुरूनगरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन आरोपींनी अत्याचार केला आहे. ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील राजगुरूनगरात महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. आरोपीने अत्याचार करण्यापूर्वी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले आणि दारू पाजली. त्यानंतर त्या मुलींना लॉजवर नेले आणि त्यांच्यावर अत्याचार केला. मुली घरी पोहचल्यावर हा प्रकार उघडकीस आला. १४ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली घरी आल्यावर पालक हादरले. त्यांनी मुलींची अवस्था पाहून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.