जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराचा ताबा घेण्यावरून एका ४० वर्षीय महिलेला तिच्या घरात घुसून दोन जणांनी शिवीगाळ करत हाताला चावा घेत धमकी दिल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की, अंजूमबी फिरोज खान वय ४० रा. पिंप्राळा हुडको, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान याच परिसरात राहणारे मेहरून्निसा कय्युब शेख आणि तिचा पती कय्युब शेख हे २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता अंजूमबी फिराज खान यांच्या घरात घुसून घराचा ताबा घेण्यावरून वाद झाला. दरम्यान हे घर माझे आहे, ते मी देणार नाही असे सांगितल्यावर अंजूमबी फिराज खान यांनी शिवीगाळ करत त्यांच्या हातावर चावा घेतला व धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहरून्निसा कय्युब शेख आणि तिचा पती कय्युब शेख दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहे.