Home क्राईम कारण नसतांना दोन बहिणींना शिवीगाळ करत मारहाण

कारण नसतांना दोन बहिणींना शिवीगाळ करत मारहाण


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवर काहीही कारण नसताना दोन बहिणींना शिवीगाळ करत मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला.

सरोज राजेंद्र बालशंकर वय-२३, रा.कीन्ही ता. भुसावळ ही तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या दोन्ही बहिणी कामाच्या निमित्ताने शुक्रवार ३१ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवर झालेल्या होत्या. त्यावेळी शाहरुख शेखलाल गवळी वय-२९, रा. कन्हाळा ता. भुसावळ याने दोघांना काही कारण नसताना शिवीगाळ केली. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.


Protected Content

Play sound