जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेरी नाका येथील देशी दारून दुकानाजवळ दारूसाठीचे उरलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याला शिवीगाळ करून दुकानासमोर ढकलून दिल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १५ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, नरेंद्र कडून चौधरी वय ४१ रा. तुकाराम वाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फळविक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान नेरी नाका येथील देशी दारूच्या दुकानात काम करणारा कार्तीक नावाच्या मुलाने नरेंद्र चौधरी यांना मागचे राहिलेले ३०० मागितले. त्यावेळी नरेंद्र यांनी फक्त १५० रूपये बाकी असल्याचे सांगितले. या रागातून कार्तीक याने नरेंद्र चौधरी यांना शिवीगाळ करत दुकानाजवळ ढकलून दिले. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कार्तीक पुर्ण नाव माहित नाही याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.