जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मी नगरातील हनुमान मंदीराजवळ किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, रत्ना समाधान लिहलकर वय ४० या महिला लक्ष्मी नगर, हनुमान मंदीराजवळ, जळगाव ह्या महिला वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या फिराजाबबी सुपडू खान यांच्या बकऱ्यांनी रत्ना लिहलकर यांच्या घराजवळील कुंडीतील झाडे खाल्ले होते.
या कारणावरून रत्ना लिहलकर यांनी बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता याचा जाब विचारला. या रागातून फिराजाबबी सुपडू खान आणि जरीनाबी शेख इरफज्ञन दोन्ही रा. लक्ष्मी नगर, जळगाव यांनी रत्ना लिहलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र ठाकरे हे करीत आहे.