जुन्या वादातून तरूणाला शिवीगाळ करत मारहाण; एकावर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी चौकात जुन्या वादातून खुन्नसने पाहण्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३१ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकारे गुरुवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर शशिकांत रगडे वय-२०, रा. न्यू सम्राट अशोक नगर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ३१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सागर रगडे हा भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी चौकात उभा असताना त्या ठिकाणी सचिन सोनवणे रा.कंडारी हा तिथे आला. त्याने जुन्या वादातून खुन्नसने पाहून लागला. याचा जाब विचारला असता सचिनने सागरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व धमकी दिली. दरम्यान जखमी झालेल्या सागर रगडे आला भुसावळ शहरातील ड्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवार १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सचिन सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विनोद ताडे करीत आहे.

Protected Content