जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील हरीओम नगरात राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज टाकून शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कानळदा रोडवरील हरीओम नगरात ३६ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान महिलेची बहिण व वहिनी यांच्याबद्दलचे अश्लिल मॅसेजेस संशयित आरोपी पंकज पाटील रा. विलकोष ता.वाडा जिल्हा पालघर याने व्हॉटसॲपवर पाठविले. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून संशयित आरोपी पंकज पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.