धक्कादायक : अकरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमास मुंबईतून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलांसाह लपंडाव खेळत असतांना ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात कोडून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या संशयित आरोपीला रामानंद नगर पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता पिडीत मुलगी ही लहान मुलांसोबत लपंडाव खेळत असतांना संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे वय ४० याच्या घरात गेली. त्यावेळी सिध्दार्थ याने पिडीत मुलगी ही घरात आली असतांना त्याने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला. दरम्यान पिडीत मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे यांच्या विरोधात बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील फरार झालेल्या संशयित आरोपीला रामानंद नगर पोलीसांनी मुंबईतून अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.

Protected Content