जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखल शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तीन वर्षापुर्वी मुलीचे कुटुंबिय एरंडोल येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपुवी जळगाव शहरातील एका दुकानावर काम करणारा हसन असलम मोमीन रा. एरंडोल जि. जळगाव यांची आणि अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाली. तेव्हा त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतू हसनला घरच्यांनी परवानगी दिली नाही. पण मुलीच्या आईवडीलांनी विचारले असता आपण आईवडीलांना समजावून सांगू यासाठी दोन वर्ष थांबावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी मुलीचे सुरत येथील मुलाशी लग्न लावून दिले. त्यावेळी मुलीचे वय कमी असल्याने मुलगी आईवडीलांकडे सज्ञान होईपर्यंत राहत होती.
दरम्यान हसनने मुलीच्या पतीला आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने पीडीत मुलीशी सुरत येथील पतीने घटस्फोट दिला. हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी हसनला घरी बोलावून लग्ना करण्याबाबत विचारले असता हसने स्पष्ट नकार दिला. या दरम्यान हसनने २४ एप्रिल २०२० रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याचे सांगितले असता लग्नाला नकार दिला. याला कंटाळून ३ डिसेंबर रोजी पीडीत मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हसन असलम मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण सोनार करीत आहे.