Home क्राईम पैशांच्या वादातून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

पैशांच्या वादातून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी मार्केटसमोर शनिवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पैशांच्या देण्या-घेण्यावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिणाबाई कॉलनीत राहणारे ४२ वर्षीय दिगंबर गोटू मेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी ९ वाजता गांधी मार्केटसमोर परवेज शेख गुलामनबी शेख आणि सोहेल परवेज शेख (दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या दोघांनी त्यांना पैशांच्या कारणावरून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दिगंबर मेटकर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी परवेज शेख गुलामनबी शेख आणि सोहेल परवेज शेख यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound