
जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या मिक्सर ट्रक आणि पॅजो रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गंगापूरी गावाजवळ घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी रविवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या पियाजो रिक्षा (क्र. MH 19 V 3704) ला जामनेरहून भुसावळकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रक (क्र. MH 19 CX 2181) ने जबरदस्त धडक दिली. ही घटना शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गंगापूरी गावाजवळ घडली. या भीषण अपघातात रिक्षातील निकिता गोपाल निंबाळकर (वय २०), सरला गोपाळ निंबाळकर (वय-१९) दोन्ही रा. चिंचखेडा बुद्रुक) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (वय ३२, रा. तळेगाव) या तीन जणांचा दुदैवी मृत्यू झाला. तर जयेश गोपाल निंबाळकर (वय १६), योगेश विठ्ठल गायकवाड (वय ४५, सर्व रा. चिंचखेडा), सुरेश विलास कापडे (वय ५०, रा. संभाजीनगर), अखिलेश कुमार (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) आणि संगीता सुभाष चौधरी (वय ५०, रा. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी फरार झालेला ट्रकचालक गोपाळ राजाराम बारी वय-५९ रा. फेकरी ता. भुसावळ याला रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल शिंदे हे करीत आहे.



