करतारपूर साहिब कॉरिडोरबाबत पाकिस्तान वरमला

70215087

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | करतारपूर साहिब कॉरिडोर सुरू करण्याच्या प्रक्रियेबाबत आज वाघा सीमेवर भारताचा पाकिस्तानशी चर्चेचा दुसरा टप्पा पार पडला. या चर्चेदरम्यान भारताने पाकिस्तानसमोर अनेक प्रस्ताव ठेवले. प्रति दिन पाच हजार भाविकांना आणि विशेष प्रसंगी दहा हजार भाविकांना प्रवेश यासारखे प्रस्ताव ठेवण्यात आले.

 

चर्चेदरम्यान दोन्ही बाजूने तांत्रिकदृष्ट्या समन्वयाबाबत सहमती झाली. पाकिस्तानने रावी नदीवर पूल बनवण्यासह अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. भारताने पाकिस्तानला या कॉरिडोरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितलं आहे. नोव्हेंबर २०१९ ला गुरु नानकांचा ५५० वी जयंती आहे, त्यामुळे तोपर्यंत हा कॉरिडोरचं काम पूर्ण व्हावं असं भारताला वाटतं.

भारतीयांसह पाकिस्तानातील भारतीय वंशाच्या नागरिकांनादेखील (ओसीआय कार्डधारक) या कॉरिडोरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्तानने शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीवरून गोपाल चावला या खलिस्तान समर्थकाची हकालपट्टी केली आहे. चावलाने मागील वर्षी भारतीय अधिकाऱ्यांना शीख भाविकांची भेट घेण्यास लाहोर येथील एका गुरुद्वाऱ्यात जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर त्याला खूप विरोध झाला होता. अमृतसर येथील निरंकारी भवनात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही चावलाचं नाव पुढे आलं होतं. मात्र चावलाला काढल्यानंतरही पाकिस्तानने कुरापती सोडल्या नाहीत. अन्य एक खलिस्तान समर्थक अमीर सिंहचा पाकने आता या समितीत समावेश केला आहे.

Protected Content