वाढीव जागा रद्द करा – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली गतीमान झाल्या असतांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढीव जागा रद्द करण्याची मागणी केल्याने निवडणुका वेळेवर होणार की नाहीत ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपरिषदांच्या जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे. तर, उर्वरित निवडणुकीसाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामुळे येत्या तीन महिन्यात राज्यात दोन टप्प्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका होतील असे मानले जात आहे. तथापि, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका मागणीमुळे निवडणुका पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.

या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्यसंख्या जनगणनेच्या आधारानुसारच वाढवली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार एकदा सदस्यसंख्या वाढवल्यानंतर २०२१ च्या जनगणनेनुसारच ही संख्या वाढविली जाऊ शकते. या निर्णयाला राज्य निवडणुक आयोगाने मान्यता कशी दिली ? असा सवाल त्यांनी केला. यामुळे आता वाढीस जागा रद्द तर नाही होणार ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content