Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद

अभिषेक पाटील यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद


patil pawar bhet

जळगाव, प्रतिनिधी | राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारादरम्यान पारोळा येथे जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज (दि.८) आले आहेत. यावेळी जळगाव शहर मतदार संघातले महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी त्यांची भेट घेवून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले.

 

यावेळी श्री.पवार यांनी प्रचार आणि निवडणुकीतील घडामोडी याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना काही महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या. अभिषेक पाटील यांना त्यांनी आपल्या शेजारी बसवून त्यांची आस्थेने विचारपूसही केली.


Protected Content

Play sound