धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत शुक्रवारी २० ऑक्टाबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारा पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. परंतू मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. यासंदर्भात तिच्या वडीलांना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.