Home क्राईम जळगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण’; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण’; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याबाबत रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound