Home क्राईम आयशरच्या धडकेत विद्यापीठ कर्मचारी जखमी

आयशरच्या धडकेत विद्यापीठ कर्मचारी जखमी

0
33
vidhyapit karmachari
vidhyapit karmachari

vidhyapit karmachari

जळगाव प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे जात असतांना आज सकाळी एका दुचाकीस्वाराला मागून येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात विद्यापीठाचे कर्मचारी दगडू गंभीर सोनगिरे (वय ४५) हे गंभीर जखमी झाली आहेत.

याबाबत माहिती अशी की, विद्यापिठाचे कर्मचारी दगडू गंभीर सोनगिरे (वय-45) हे रविवारी चोपडा येथे गेले होते. आज (दि.8 जुलै) सोमवारी रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक (एमएच.19.डीबी.0947) ने विद्यापिठाकडे येत होते. त्यावेळी महामार्गावर पाळधी ते विद्यापीठ दरम्यान त्यांना मागून येत असलेल्या आयशरने धडक दिली. अपघातात ते रस्त्याच्याकडेला फेकले गेले. यावेळी रस्त्याने ये-जा करणार्‍या काही नागरिकांनी त्यांना उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, आयशर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला असून दगडू सोनगिरे यांच्या चेहर्‍याला, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.


Protected Content

Play sound