जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी कॉलनीतील रहिवासी आत्माराम काशिनाथ हजारे यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी आशुतोष हजारे यांचे वडील आत्माराम काशिनाथ हजारे ( वय 54 ) यांनी आज पहाटे उपचार सुरू असतांना अंतीम श्वास घेतला. ते औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 1o.30 वाजता नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आत्माराम हजारे यांना चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख पेलवण्याचे बळ परमेश्वर ताकद प्रदान करो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवार हजारे कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत.