नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी हे लवकरच देशासमोर येऊन रडतील असे एका खासदाराने १७ एप्रिल रोजी केलेले भाकीत खरे ठरले असून याबाबत आता सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी देशातील डॉक्टरांशी संवाद साधतांना गहिवरून आल्याचे याबाबत मेस्ट्रीम आणि सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेचे अनेक जण कौतुक करत आहेत. तर यावर टीकादेखील होत आहे. आता पंतप्रधानांच्या गहिवरण्याला आम आदमी पक्षाच्या खासदाराने केलेल्या ट्विटमुळे नवा आयाम मिळाला आहे.
आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील आपचे खासदार असणाऱ्या संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपने म्हटलं आहे.
१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय यांनी, “अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं.
याच मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर निशाणा साधला. “जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोयत ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,” असा टोला संजय यांनी लगवाला आहे.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021