जनशक्ती अभियान राबविण्याच्या पार्श्वभूमीवर आपची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे आम आदमी पार्टीच्या शहर व जिल्हा कमिटीची बैठक घेण्यात आली. यात निवडणूकांसह राबविण्यात येणाऱ्या जनशक्ती अभियानाबाबत चर्चा करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे राज्य सह प्रभारी मा.श्री.गोपालजी भाई इटालिया यांच्या आदेशानुसार.महाराष्ट्र संघटक सचिव  मा.श्री.नविंदरसिंग अहलुवालिया सर यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी व जळगाव शहर महानगर अध्यक्ष अमृता ताई नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगाव अजिंठा विश्रामगृह येथे जळगाव जिल्हा कमिटी व जळगाव शहर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीमध्ये हंगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्र मध्ये निवडणूका लढवणार आहे.  त्यासंदर्भात ज्या ज्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या असतील त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य सचिव. नविंदरसिंग अहलुवालिया यांनी केले.व आम आदमी पार्टीचा जनशक्ती अभियान  मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे.

यासंदर्भात जळगाव जिल्ह्यात व जळगाव शहरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. या बैठकीत उपस्थित जळगाव जिल्हा समन्वयक योगेश हिवरकर, जिल्हाउपाध्यक्ष प्रा.गणेश पवार, जिल्हा सचिव डॉ. नारायण आटकोरे, ॲड. विजय दानेज, जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख इरफान भाई, डॉ महेश पवार, ओम प्रकाश अग्रवाल, डॉ अनुजा पाटिल, चंचल सोनावणे, प्रमोद पाटील, स्वप्नील पाटील, भीमराव मोरे, निरंजन मराठे, सरिता तायडे, जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता जळगाव शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content