‘आप’चं ठरलं : महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार नाही

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हरीयाणा विधासभा निवडणूकीत काँगेसचा मोठा पराभव झाला त्यामुळे इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहे. निवडणूकीसाठी फाटाफुटीचे राजकारण होत असल्याने महाराष्ट्र व झारखंड राज्यातील इंडिया आघाडीचे नेते विचार करून निवडणूक लढविणार आहे. यातील आम आदमी पार्टी ने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक लढविणार नाही असा निर्णय घेतला असून निवडणूकीत इंडिया आघाडीचा पाठींबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आपच्या या खेळीमुळे भाजपाला मोठा धक्का बसु शकतो असे देखील बोललं जात आहे.

 

आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे.

Protected Content