Home Cities मुक्ताईनगर कन्या संजना पाटील यांच्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा घरोघरी प्रचार दौरा !

कन्या संजना पाटील यांच्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा घरोघरी प्रचार दौरा !

0
151

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराला मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या थेट ‘जनसंवाद’ दौऱ्यामुळे एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या आमदार कन्या संजना पाटील यांच्यासह प्रभाग क्र. १४ आणि १५ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी खुद्द आमदारांनी नागरिकांच्या घरात जाऊन संपर्क साधला आणि मतांचे आवाहन केले.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या प्रमुख लढतीत आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजनाताई पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. या प्रतिष्ठेच्या जागेसाठी आमदार पाटील यांनी कोणतीही कसर न सोडण्याचा निर्धार केला असून, पारंपरिक प्रचारसभांपेक्षा थेट मतदारांशी जोडणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

मंगळवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजना पाटील, प्रभाग क्रमांक १४ नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद भारंबे आणि प्रभाग क्रमांक १५ च्या उमेदवार सौ. सविता भलभले यांच्यासह संपूर्ण परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ रस्त्यावरून फिरून किंवा कॉर्नर सभा घेऊन प्रचार न करता, थेट नागरिकांच्या घरात प्रवेश करून त्यांच्याशी संवाद साधला. घरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांशी त्यांनी चर्चा केली. उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करतानाच, त्यांनी शहराच्या प्रलंबित विकास कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या थेट आमदारांपर्यंत पोहोचवल्या आणि आमदार पाटील यांनी त्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दिली. स्थानिक विकास आणि नागरिकांशी व्यक्तिगत नातेसंबंध या दोन मुद्द्यांवर हा प्रचार प्रामुख्याने केंद्रित झाला होता.

आमदार पाटील यांनी जनतेच्या दारात जाऊन संवाद साधल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मतदारांनीही आमदार पाटील यांचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले. एका आमदाराने स्वतः घरोघरी जाऊन प्रचार केल्यामुळे या तिन्ही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. स्थानिक नेत्यांसह अनेक कार्यकर्ते या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound