मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आता युती आणि आघाड्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी आधीच उध्दव ठाकरे यांनी निवडणुकांसाठी आपल्या सोबत यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तर ठाकरे यांनी मात्र वेगळाच पवित्रा घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यात त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. स्थानिक पातळीवर आघाडी करायची असल्यास तो निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असे देखील त्यांनी सुचविले. मात्र त्यांनी निवडणुका स्वबळावरच लढविण्यात येतील असे स्पष्ट केले.