यावल (प्रातिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ.पायल तडवी आत्महत्त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि यातील गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीसाठी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने आज एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावल तहसील कार्यालया समोर आज सकाळी १० वाजता आदीवासी डॉ.पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणातील दोषीना कठोर शिक्षा व्हावी, या मागणी करीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे राज्य अध्यक्ष एम.बी. तडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनास आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष मधुकराव चौधरी, मनिषा किशोर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भारतीय ट्रायबल पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद बाबु तडवी, कल्पेश राजेंद्र पवार, पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, डॉ.एन.डी. महाजन, डॉ.परवीन तडवी, सिताराम काशीनाथ पाटील, डी.पी.साळुंके, कमलाकर पाटील यांच्यासह विविध संघटना ,राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलनास आपला पाठींबा दिला. या धरणे आंदोलनास एम. बी. तडवी, जे.एम. तडवी,सलदार बलदार तडवी, सर्फराज तडवी, माजित तडवी, फत्तु तडवी, जुम्मा अकबर तडवी यांनी सहभाग घेतला. यावलचे निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना डॉ.पायल तडवी आत्महत्त्या संदर्भातील योग्य कारवाई करण्याचे निवेदन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थित निवेदन देवुन आंदोलनाची सांगता झाली.