पुणे (वृत्तसंस्था) एनआरसी आणि कॅब विरोधात आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जणांना याविषयी किती माहिती आहे याबद्दल शंका आहे. या कायद्याबद्दल अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवण्यासाठी जनतेला याकडे गुंतवून ठेवले. आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येते, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही?, असा सवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी माणसांची आवश्यकता आहे का? जे आधीपासून आहेत, त्यांना सोयी-सुविधा मिळत नाहीयत. इथे राहणाऱ्या लोकांच्या चिंता मिटत नाहीयत मग आपण अजून बाहेरचे लोक कशासाठी घेतोय ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच इतर देशांतील नागरिकांना सामावून घ्यायला भारत काही धर्मशाळा नाही, अशी स्पष्ट भूमिकाही राज यांनी मांडली. राज्याकडे यंत्रणा आहेत. पोलिसांना कोणत्या देशातून कुठे नागरिक आले आहेत हे माहिती आहे. मात्र, सरकार यावर निर्णय घेत नाही. मुंबईत अशी अनेक ठिकाणं दाखवू शकेल जेथे बांग्लादेशी नागरिक आहेत. यावर सरकारने काम करायला हवं. दरम्यान, आधारकार्ड,मतदान कार्ड हे मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी हे कार्ड का चालू शकत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.