कोल्हापूरात रिल्सच्या वादातून एका तरूणाची हत्या

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडिया रिल्सच्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात घडली आहे. संभाजीनगरातील सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरूवारी आज दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. सुजल बाबासो कांबळे असे मृताचे नाव आहे. त्याचा ८ ते १० जणांच्या टोळक्याने खून केला. याबाबतजुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगर परिसरातीलसुधाकर जोशी नगरातील एका चौकातगुरुवारी दुपारीसुजल कांबळे मित्रांसहगप्पा मारतबसला होता. यावेळीतीन दुचाकीवरून आलेल्या८ ते१० जणांनी त्यांच्यावर तलवारींनीहल्ला केला.हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. सुजलला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्यालासीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीपीआर परिसरातसंभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Protected Content