अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसांना माहिती देतो या संशयावरून तरूणावर चाकूने वार करून जखमी केले तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता अमळनेर शहरातील सुभाष चौकात घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल रमेश भोई वय २९ रा. शिवशक्ती चौक, अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहूल भोई हा त्याचा चुलत भाऊ सुभाष भोई यांच्या सोबत सुभाष चौकात उभा होते. त्यावेळी राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ रा. जुना पारधी वाडा, अमळनेर हा तिथे आला. दरम्यान, राहूल भोई हा पोलीसांना माहिती देतो असा गैरसमज करून राजेश निकुंभ याने हातातील चाकूने राहूलवर वार करून गंभीर जखमी करत दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी १ जानेवारी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत हे करीत आहे.