वसई येथे भर रस्त्यात तरूणीची हत्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पान्ह्याने तरूणीच्या डोक्यात वार करण्यात आले. त्यात त्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. आरती रामदुलार यादव असं तरूणीचं नाव आहे. ती 22 वर्षाची होती. तर रोहित रामनिवास यादव याने या तरूणीचा खून केला. त्याचे वय 29 वर्ष आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे.

प्राथमिक माहिती नुसार एकतर्फी प्रेमातून रोहित यादव याने हे कृत्य केले. सकाळी सकाळी झालेल्या या खूनाने वसईमात्र हादरून गेली आहे. रोहित याने तिचा खून केल्यानंतर तो तिच्या मृतदेहा जवळ बसला होता. लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. मुलीची स्थिती पाहीली तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात घाव केले गेले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी लगेचच रोहित याला ताब्यात घेतले.

Protected Content