तरूणाचे बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील वर्धमान नगर भागात राहणाऱ्या तरूणाच्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, आनंद पिरन शिरसाठ वय ३७ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत, ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये त्यांचे वर्धमान नगरातील घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आला. त्यानंतर त्यांनी याबाबत गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे हे करीत आहे.