जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरातील निमजाई ट्रेडर्सच्या बाजूला पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज सुकलाल राठोड (वय-२४) रा. ज्ञानदेव नगर, निमजाई ट्रेडर्स जवळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १५ इवाय ८१६७) निमजाई ट्रेडर्सच्या बाजूला मोकळ्या जागेत पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. सुरज राठोड यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आले नाही. अखेर दुपारी १२ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.